चिपळूण – चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील कातळवाडी आज चिपळूणचे उपविभाग पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने या परिसरात छापा मारून गावठी दारूची भट्टी व दारू विकताना गुरुनाथ सहदेव हळदणकर याला रंगेहाथ पकडले त्याला ताब्यात घेण्यात आले असुन हात भट्टीला लागणारे गूळ, व नवसागर सह दारू जप्त केली आहे.
रामपूर परिसरातील जंगलमय भागात गुरुनाथ सहदेव हळदणकर रा. रावळगाव शिंदेवाडी हा इसम गावठी दारू हातभट्टी मधून काढून विकतो अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी डीवायएसपीच्या पथकाने छापा टाकला असता खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
यामध्ये ३५ लीटर मापाचे ६ प्लास्टिक चे कँन त्यामध्ये एकुण १७० लीटर गावठी हातभट्टीची दारू, एक ५०० लीटर मापाची प्लास्टिक टाकी त्यामध्ये ५०० लीटर गुळ व नवसागर मिश्रीत रसायन,पाच ५०० लीटर मालाच्या प्लास्टिकच्या रिकाम्या टाक्या , दोन २०० लीटर मापाची पत्राची बॅरल,एक अँल्युमिनीयमची ६० लीटर मापाचा डेचका ,स्टीलचे परातीला लोखंडी पाईप वेल्डिंग केलेले दोन चाटु, बँरेलला गुंडाळलेल्या कापडी चिंध्या ,दोन पेटकी लाकडे असा एकुण २६,५००/- किमतीचा माल जप्त करण्यात आला. आरोपीत गुरुनाथ सहदेव हळदणकर रा. रावळगाव शिंदेवाडी यांचेविरुध्द चिपळूण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२० महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अँक्ट कलम ६५(ब)(क)(ड)(फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मध्ये
सपोफौ/३९२ चव्हाण, पोना/५०६ शेख, पोना/१२२२ सकपाळ, पोना/१२५६ जाधव, पोकाँ/१२६८ कुळ्ये, पोना/१२२३ यादव यांनी सहभाग घेतला