गुहागर ; गुहागर ग्रामीण रुग्णालयातील त्या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

0
201
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मध्ये सर्पदंश झालेला रुग्ण दाखल होतात त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आपल्या डॉक्टर पत्नीला सांगून स्वतःच्या खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावणाऱ्या गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरविरोधात गुहागर येथील ग्रामस्थ राहुल उल्हास कनगुटकर यांनी कोल्हापूर उप संचालक आरोग्य सेवा यांसह आरोग्य मंत्री, पालकमंत्री, आमदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

राहुल कनगुटकर हे पालशेत येथील आपली बहीण आसावरी पिलणकर यांना सर्पदंश झाल्याने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी तेथे शाळा तपासणी डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ.शशांक ढेरे यांच्या पत्नी डॉ. सौ. गीता करे यांनी निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान, दिलेल्या इंजेक्शनमुळे सौ. पिळणकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना विचारले की, आज डॉ. शशांक ढेरे यांची ड्युटी असताना ते आहेत कुठे, यावर त्यांच्या पत्नी डॉ. गीता करे यांनी डॉक्टर आजारी असल्याचे सांगून मी ड्युटी करत असल्याचे सांगितले. संबंधित नातेवाईकांनी याची खात्री करण्यासाठी आपली माणसे शृंगारतळी येथील डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये पाठवली. त्यावेळी डॉ. शशांक ढेरे हे शृंगारतळी येथील खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गीता करे यांनी डॉक्टर आजारी असल्याचे खोटे बोलून रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली. ही सर्व बाब गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकारिणीतील सदस्य सिध्दिविनायक जाधव यांच्यासमोर डॉ. गीता करे यांनी याची कबुली दिली. वरील विषयाचा गांभीर्याने विचार करुन कामचुकार डॉ. शशांक ढेरे यांच्यावर योग्यती कारवाई करावी, अशी मागणी राहुल कनगुटकर यांनी पत्राद्वारे केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here