गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ओंकार बेकरी मार्ट या बेकरी मधून काही दिवसापूर्वी राहटे नामक व्यक्तीने सोनपापडीचा बॉक्स विकत घेतला होता त्या बॉक्समध्ये आळ्या आढळल्याने त्याबाबत त्या बेकरी मालकाला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती याबाबत सडेतोडपणे वृत्त प्रसिद्ध करून प्रगती टाइम्सने हा प्रकार उजेडात आणला होता प्रगती टाइम्सच्या या वृत्ताची दखल अन्न व औषध प्रशासन विभागाने घेऊन नुकतीच या बेकरी मार्ट वर कारवाई केली व त्या बेकरी मालकाला वीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्या बेकरीची स्वच्छता करण्याचे निर्देशही दिले आहेत.
प्रगती टाइम्सने सडेतोडपणे वृत्त प्रसिद्ध दिल्याने या बेकरीवर कारवाई होण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना आहे. या आधी सुद्धा प्रगती टाइम्सने शृंगारतळी येथील एका बेकरी मधील भयानक प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी त्या बेकरी मालकाला दंड लागला होता. त्याचप्रमाणे गिमवी फाटा येते चायनीज सेंटर मध्ये विषबाधा झाल्याचे प्रकरण सुद्धा प्रगती टाइम्सने उजेडात आणले होते. त्यावेळी सुद्धा त्या चायनीज मालकावर कारवाई होऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने दंड ठोठावला होता. प्रगती टाइम्स अशाप्रकारे सडेतोड वृत्त देत असल्याने सर्व स्तरातून प्रगती टाइम्सचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.















