शुंगारतळी ; बेकरीच्या खाद्यपदार्थामध्ये सापडल्या अळ्या… वर्षभरानंतर दुसरा प्रकार

0
1213
बातम्या शेअर करा

गुहागर– गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत ओंकार बेकरी मार्ट या नावाने असलेल्या दुकानात सोनपापडी या खाद्यपदार्थामध्ये अळ्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. वर्षभरातील ही दुसरी घटना असून ऐन सणासुदीच्या हंगामात हा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बेकरीमध्ये बनविल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये सापडणाऱ्या कीडी, अळ्या हा प्रकार बऱ्याच वेळा समोर आलेला आहे. सर्वसामान्य खरेदीदार ग्राहक याच्या तक्रारी न करता दुर्लक्षच करतात. त्यामुळे असे प्रकार उघडकीस येत नाहीत. वर्षभरापूर्वी शृंगारतळीतील एका बेकरीमध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ सापडले होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी विभागाने यावर कडक कारवाई करुन काही दिवस बेकरी बंद केली होती. या कारवाईचा फार्स झाल्यानंतर एक वर्षातच पुन्हा असा प्रकार आढळून आला आहे. शृंगारतळीतील रहाटे नामक एका व्यक्तीने रविवारी शृंगारतळी बाजारपेठेतील ओंकार बेकरी मधून सोनपापडीचा पुडा विकत घेतला. घरामध्ये गेल्यावर या पुड्यामध्ये त्याला अळ्या सापडल्या. सोमवारी बाजारपेठ बंद असल्याने हा ग्राहक मंगळवारी पुडा घेऊन या बेकरीमध्ये आला.

ग्राहकाने या बेकरीतील कामगारांच्या हे लक्षात आणून दिले असता, कामगारांनी संबंधित कंपनीकडे तक्रार करावी, असे त्याला प्रतित्युर दिले. मात्र, ग्राहक अशिक्षित असल्याने तक्रार कुठे करायची हे माहित नसल्याने हा विषय तेथेच थांबला. असे असले तरी बेकरी मार्टमध्ये अशा पध्दतीचे मुदत संपलेले खाद्यपदार्थ ठेवले जात असल्याने ग्राहकांच्या जीवाशी हा खेळण्याचा प्रकार असल्याची संतापजनक भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात हा प्रकार उघड झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून अन्न औषध प्रशासनाने येथे कारवाईची धडक मोहीम राबवावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here