तुम्ही चिपळुणची हंडी फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो.भास्कर जाधव असे कोणाला म्हणाले…..

0
985
बातम्या शेअर करा

चिपळूण -रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चिपळूण याच चिपळूणमध्ये राजकारण कसं चालेल…. याचा शेवटपर्यंत कधीच अंदाज कुणाला येत नाही…. त्याचे कारणही तसेच आहे.

काही दिवसापूर्वी कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी आमदार रमेश कदम आणि आमदार भास्कर जाधव यांनी गळाभेट घेतली होती. आणि आज चिपळूण मधील रमेश भाई कदम प्रतिष्ठानच्या वतीने चिपळूण येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितीती लावून सगळ्यांच्याच मनाला जोरदार धक्का दिला. यावेळी त्यांनी रमेश भाई कदम यांचे जोरदार कौतुक केले. रमेश भाई तुम्ही चिपळूणची हंडी फोडा
.. मी तुम्हाला खांद्यावर घेतो असे वचनही त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे रमेश भाई तुम्ही एक चांगले कबड्डीपटू आहात तुम्हाला समोरच्यावर कशी पकड घालायची हे माहिती आहे. तुम्ही पकड घालताना मी तुमच्यासोबत राहतो असा आश्वासन दिले. त्यामुळे आगामी काळात चिपळूण विधानसभा मतदारसंघातून रमेश कदम जर निवडणुकीसाठी उभे राहिले तर भास्कर जाधव त्यांना नक्कीच मदत करतील अशीच या शब्दरचनेतून चर्चा सुरू झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here