बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर – चिपळूण मार्गावरील रामपूर घाटात आज सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.

चिपळुण तालुक्यात आज दिवसभर जोरदार पाऊस पडत होत . या पावसामुळे चिपळूण- गुहागर मार्गावरील रामपूर घाटात दरड कोसळली. याची माहिती मिळताच चिपळूणचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण, सदस्या अनुजा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश कातकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी तेथील परिस्थितीची पाहणी करून याची माहिती बांधकाम विभागाला दिली व ही दरड बाजूला करण्याची मागणी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here