चिपळूण – ,सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात काल रात्री 9.33 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना धरण परिसरात उत्तरेला 17.36 किलोमीटर आहे. तर 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते. गेल्या महिन्याभरात या परिसरात भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र असे असले तरी या भूकंपाने कोणतीही हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती आहे.