बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वाब रिपोर्ट आज 5 दिवस झाले तरी अहवाल न आल्याने आरोग्य कर्मचारी वर्गातून नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दोन महिला कर्मचारी व आरोग्य सेवक पुरुष आहे.

15 तारखेनंतर गुहागर तालुक्यातुन घेण्यात आलेले इतर स्वाब यांचे रिपोट आले मात्र 15 तारखेला घेतले गेलेले आरोग्य कर्मचारी यांचे स्वाब रिपोट अध्याप का आले नाही? की रिपोट आलेले असताना सुध्दा ते कर्मचारी वर्गांला मुद्दम त्रास देण्यासाठी सांगितले जात नाहीत अशी चर्चा सध्या या गुहागर तालुक्यात सुरू आहे.

जर आरोग्य कर्मचारी यांचा आरोग्य असं वार्‍यावर जाणार असेल तर भविष्यात या तालुक्यातील आरोग्य यंत्रणाला मोठी अडचण निर्माण होईल कारण आज याच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे तालुका अद्यापही सुस्थितीत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यापासून अफाट मेहनत घेतली आहे आणि असे असताना सुद्धा जर त्यांचे कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वाब गेले पाच दिवस त्याबाबत पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे जर प्रशासन सांगत नसले तर खरोखरच या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा आता आरोग्य विभागातील इतर कर्मचारी बोलू लागले आहेत.तरी संबंधित अधिकारी वर्गाने याकडे त्वरित लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांचे अहवाल जो काही असेल तो जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा यानंतर जर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी असतील.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here