जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या गुहागर मधील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

0
1112
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्चीवर बसलेले कर्मचाऱ्याची हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गुहागर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रकाश पांडुरंग खांडेकर वय वर्षे 54 रा. मुंढर गुहागर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयातील महसूल शाखेत खुर्चीवर बसलेले असतानाच बेशुद्ध पडले यानंतर तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

आज सकाळी गुहागर येथुन कार्यालयीन कामासाठी गुहागर तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रकाश खांडेकर आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. प्रकाश खांडेकर हे २०२५ साली निवृत्त होणार होते. कार्यालयीन कामकाज करत असताना अचानक चक्कर आल्या सारखे होऊन ते खुर्चीतच बेशुद्ध पडले.त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले माञ हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

दरम्यान घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर गेलेले खांडेकर आता  घरी व तहसीलदार कार्यालयात कधीच परतणार नाहीत या आठवणीनेच अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे.

सरकारी नोकरीला लागण्यापूर्वी खांडेकर हे मिल्ट्रीमध्ये होते. गुहागर तहसील कार्यालयात अनेक जागा रिक्त असून सगळा भार हा पुरवठा निरिक्षक असलेल्या प्रकाश खांडेकर यांच्यावर पडत होता अगोदर ते खेड मध्येही पुरवठा शाखेत होते. अत्यंत साध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्यापूर्वीच ते आपल्या गावाजवळील गुहागरला हजर झाले होते.त्याच्या पश्यात आई,पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here