गुहागर ; शिवजयंती मिरवणुकीत मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी ; महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग

0
199
बातम्या शेअर करा

गुहागर – जिल्ह्यात नेहमीच शांत तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील हिंदू- मुस्लिम समाजामधील जातीय सलोखा सर्वांचं माहीत आहे. वर्षात येणारे सर्वच सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा तालुक्यातील हिंदू- मुस्लीम समाजाने जपली आहे. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे आज झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात सर्वांना पहावयास मिळाले. शृंगारतळी व गुहागरमध्ये शिवरथाचे मुस्लिम बांधव व भगिनी यांनी स्वागत केले. सकाळी सुरू झालेली शिव यात्रेचे सायंकाळी 5 वाजता अंजनवेल येथील गोपाळगडावर भगवे ध्वज फडकावून समारोप करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शीवभक्त गुहागरवासीय यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिव पादुकांच्या रथाची शृंगारतळी जानवळे फाटा ते अंजनवेल येथील किल्ले गोपाळगडावर रॅली काढण्यात आली. असंख नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी आकर्षक शिवरथ तयार करण्यात आला होता. शिवरथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.


मुस्लिम बांधवांनी शृंगारतळी बाजारपेठेत शिवरथा मधील शिवपादुकांना पुष्पहार घालून मिरवणुकीतील शिवप्रेमींना गळाभेट करून त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर रॅलीमधील शिवप्रेमींना पाणी, थंडपेये, बिस्किटे यांचे वाटप केले. निळकंठेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी शिव यात्रेत मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिवाजी चौक येथे शहरातील ग्रामस्थ व बचत गटांच्या महिलांनी जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय भवानी जय शिवाजी.., च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी खास पालघर वाडा येथून आलेले कुलदीप दुर्गुडे यांनी छ. शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. घोड्यावरून रुबाबात महाराजांची शिव यात्रा चालली होती. श्री देव व्याडेश्र्वर मंदिर, व्याघ्रांबरी मंदिर, दुर्गादेवी मंदिरामध्ये शिव पादुकांचे पूजन करण्यात आले. गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य गीत म्हणण्यात आले.


वरचापाट मुस्लिम मोहल्ल्यातील महिलांनीहि रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत करून जय भवानी जय शिवाजी..घोषणा दिल्या. शिव यात्रेत सक्रिय सहभाग घेत मुस्लिम समाजाने हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. सायंकाळी 5.30 वाजता अंजनवेल गोपाळगड किल्ल्यावर छ. शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारलेले कुलदीप दूर्गुडे यांच्या हस्ते भगवा ध्वजा फडकवण्यात आला. त्याआधी किल्ल्यावर शृंगारतळी येथील लिटिल चॅम्प्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महराजांच्या जीवनावरील गीतांवर नृत्य कवायती करत सादर केले. सर्व शिवप्रेमींना अंजनवेल ग्रामस्थांच्या वतीने जेवण देण्यात आले. या शिव यात्रेत तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here