गुहागर – राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यानंतर सगळीकडे शिवसेनेमध्ये गट पडले याच पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सुद्धा एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट सक्रिय होत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. याआधीच भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक अमरदीप परचुरे बाबू कनगुटकर यांच्यासह अनेकांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. आज पुन्हा एकदा गुहागर मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आज आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुहागर शिवसेना उद्धव ठाकरे गट गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे ,माजी युवासेना शहरप्रमुख राकेश साखरकर,उपशहरप्रमुख मनीष मोरे ,ऍड. सुशील अव्हेरे,विभागप्रमुख विरेश बागकर, प्रथमेश चाफेरकर, निलेश मोरे शहरप्रमुख यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आता गुहागर मतदारसंघात सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या जोमाने उभी राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हे सर्व तरुण नेते आमदार उदय सामंत व भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात गुहागर मतदारसंघातील अजून कोणते नेते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे.
गुहागर मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना जोमाने वाढावी बाळासाहेबांचे विचार कायमस्वरूपी राहावे यासाठी आपण कायमस्वरूपी प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबू कनगुटकर यांनी यावेळी सांगितले त्यावेळी त्यांच्यासोबत रोहन भोसले अमरदीप परचुरे महेश तावडे सुशील आग्रे आदी उपस्थित होते.