गुहागर ; पालशेतमधील शाळा शौचालय दुरुस्ती कामात घोटाळा? गटविकास अधिकारी व ग्रा. पं.ची ‘ सोयी ‘ स्कर डोळेझाक!

0
374
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी ग्रां.पं.कार्यक्षेत्रातील बारभाई, निवोशी व काळे वठार प्राथमिक शाळांच्या शौचालय दुरुस्तीच्या कामामध्ये घोटाळा झाला असून हा गैरव्यवहार पालशेतची ग्रा.पं.पदाधिकारी आणि पंचायत समिती अधिकारी तक्रार करून देखील याबाबत ‘सोयी’ स्कर डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रा.पं.सदस्य मिनार पाटील आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत गटविकास अधिकारी, गुहागर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१५ वा वित्तआयोग ग्रा. पं. स्तर यामधून बरभाई प्राथमिक शाळेच्या शौचालय दुरुस्तीसाठी १लाख १७ हजार १३९ रु, काळे वठार शाळेसाठी १लाख ५२ हजार १९३रु. आणि निवोशी शाळेसाठी ३ लाख १९ हजार ७५२ रु? इतकी घसघशीत आर्थिक तरतूद ही केवळ दुरुस्तीसाठी करण्यात आली. तसे अंदाजपत्रक करण्यात आले. तरीही अंदाज पत्रकानुसार ही कामे नाहीत त्यामध्ये तफावत आहे. अनेक कामांमध्ये अनावश्यक कामांचा समावेश करून काही कामांसाठी अवाजवी अपेक्षित खर्च अंदाज पत्रकाकामध्ये दाखविण्यात आला आहे.

मूळचे काम तसेच ठेऊन केवळ बाहेरून रंग रंगोटी करून काही कामे रेटण्यात आल्याचा आरोपही या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. मूल्यांकन मात्र अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आले आहे. शाळांच्या शौचालय दुरुस्तीला इतका खर्च होऊ शकतो हे सर्वसामान्य लोकांना आत्ता या विकास कामांमध्ये करण्यात आलेल्या अंदाजपत्रकिय आर्थिक तरतुदीवरून कळतंय. मात्र स्थानिक उच्च दर्जाचे बांधकाम व्यावसायिकांच्या अनुभवानुसार हा दाखविण्यात आलेला अंदाजपत्रकिय खर्च दुपटीपेक्षा जास्त असावा. असे म्हणणे आहे.
संबंधित कामाच्या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले. मात्र आक्षेप घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था असताना दिवे बंद करून कोणी पाहू नये म्हणून चोरासारखे मोबाईल बॅटरीच्या मिणमिणत्या प्रकशामध्ये काम उरकण्याचा केविलवाणा प्रयत्न ठेकेदाराने केल्याची माहिती ग्रा. पं.सदस्य मिनार पाटील यांनी दिली.

निधी तरतुदीच्या समस्येमुळे, कमतरतेमुळे गावांचा विकास अडचणीत येऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून थेट ग्रा. पं.ना प्राप्त होणारा निधी संबंधित अधिकारी, ग्रा. पं.पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने विकास कामांना टक्केवारी लावून संबंधित अधिकारी, ग्रा. पं.चे पदाधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात जातो. कामांची पाहणी न करता कामांचे अंतिम मूल्यांकन झाल्याचे या शौचालय दुरुस्ती कामात स्पष्ट होत असून मूल्यांकन झाल्यानंतरही, काम पूर्ण झाल्याचा फलक संबंधित कामाच्या ठिकाणी लावल्यानंतर ही काम सुरू असावे यातच संबंधितांनी संगनमताने स्वार्थासाठी वाढीव अंदाज पत्रक तयार करून जनतेला बनविण्याचे उद्योग केल्याचे पाटील यांनी दिलेल्या महितीमधून स्पष्ट होत आहे. आणि म्हणूनच गटविकास अधिकारी, गुहागर यांनी प्रत्यक्ष भेटीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप पाटील यांनी केला असून या विकास कामांमध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी ठोस पुरावे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी, गुहागर यांनी आवश्यक व योग्य कार्यवाही ना केल्यास ग्रामस्थांसह गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here