गुहागर ; अबब…हे स्टार प्रचारक लढतायत गावातील निवडणुक…….

0
900
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या एकच धुळवड सुरू आहे. त्यातच अनेक जण आपलं नशीबही आजमावत आहेत. मात्र सध्या सर्वात चर्चेचा विषय बनला आहे तो तालुक्यातील लोकप्रतिनिधी…… होय तेच लोकप्रतिनिधी जे तालुक्यातील राजकारणावर त्यांच्या त्यांच्या पक्षात तालुकास्तरीय पदावर काम करतात. मात्र त्यांनाच त्यांच्या गावात निवडणूक लढवावी लागते त्यामुळे घर की मुर्गी दाल बराबर…… अशी चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की हल्ली बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक हे सगळीकडेच पाहायला मिळते मात्र काही ठिकाणी गावागावातील वादच या निवडणुकीला कारणीभूत ठरतात त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी निवडणुका होताना दिसतात.
आपल्या गावचा विकास करण्यासाठी गावातली काही लोकप्रतिनिधी हे विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या कार्यकारिणीवर जातात व तालुक्यावर वर्चस्व गाजवत असतात. त्याच माध्यमातून ते विविध पदही भूषवत असतात. त्यात कोणी अध्यक्ष कोण उपाध्यक्ष, सरचिटणीस ,युवा जिल्हा कार्यकारणी व सदस्य किंवा इतर काही पद हे नेते भूषवत असतात.

मात्र जिल्ह्यासह तालुक्याच्या कार्यकारणी असलेल्या याच पदाधिकाऱ्यांना मात्र त्यांना गावच्या निवडणुका मात्र बिनविरोध करताना खूप विरोध होतो. वैयक्तिक त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना गावातून विरोध केला जातो. गुहागर तालुक्यात सुद्धा अशीच परिस्थिती काही गावांमध्ये दिसून येते. असेच काही उमेदवार आहेत जे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात मोठी नाव आहेत. मात्र गावच्या निवडणुकीत मात्र बिनविरोध न होता त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष निवडणुक लढवावी लागत आहे.

तर पाहूया असे तालुक्याचे नेते जे सध्या निवडणूक लढवत आहेत…….

विधानसभा 2019 ची निवडणूक लढवणारे बसपा उमेदवार उमेश पवार हे आबलोली इथून निवडणूक लढवत आहेत.

इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर पाटपन्हाळे गावातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे उत्तर रत्नागिरी वाहतूक संघटना जिल्हा उपअध्यक्ष महेश कोळवणकर पाटपन्हाळे गावातून निवडणूक लढवत आहेत.मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या पत्नी सिद्धी जानवळकर जानवळे गावातून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे माजी युवक तालुकाध्यक्ष मंगेश कदम यांच्या पत्नी चिखली ग्रामपंचायत मधून निवडणूक लढवत आहेत.
भाजप अल्पसंख्याक आघाडी गुहागर तालुका अध्यक्ष आसिफ दळवी पेवे पांगरी गावातून निवडणूक लढवत आहेत.साईनाथ काळजुंनकर भाजपा तालुका चिटणीस हे आरे गावातून निवडणूक लढवत आहे.सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष प्रणय आर्यमाने आबलोली गावातून निवडणूक लढवत आहेत.भाजपचे तालुका सरचिटणीस सचिन ओक कोतलुक या गावातून निवडणूक लढवत आहेत.भाजपचे माजी युवा तालुकाध्यक्ष अतुल लांजेकर झोंबडी गावातून निवडणूक लढवत आहेत.शृंगारतळी शिवसेना शहराध्यक्ष नरेश पवार यांचे बंधू संजय पवार पाटपन्हाळे गावातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उपविभाग प्रमुख नुर दळवी पांगरी तर्फे हवेली या गावातून निवडणुक लढवत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here