गुहागर ; ग्रामपंचायत निवडणुक दुसऱ्या दिवसापर्यंत २२ उमेदवारी अर्ज दाखल

0
172
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत सरपंचपदासाठी चार, तर सदस्यपदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यातील आरे, आवरे असोरे, आबलोली, कोतळुक, कौंढर काळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, झोंबडी, धोपावे, पाली, पाटपन्हाळे, पालकोट त्रिशूळ, पांगारी तर्फे हवेली, पोमेंडी, मढाळ, वरवेली, वडद, साखरी त्रिशूळ, हेदवी, जांभारी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जानवळे झोंबडी, खोडदे, कौंढर काळसुर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज, तर सदस्यपदासाठी आरे १, आबलोली २, कोढर काळसूर ५, झोंबडी ५, पांगारी तर्फे हवेली ९ आदी २२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली.आहे. यामध्ये प्रामुख्याने आरे, पाटपन्हाळे, वरवेली, कोतळूक आदी मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुहागर पंचायत समिती सभागृहासह कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पंचायत समिती आवारात गेली दोन दिवस तालुक्यातून मोठी गर्दी होत आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here