गुहागर – गुहागर नगरपंचायतीच्या डांबरीकरणाच्या कामाच्या निवेदनामधील हॉटमिक्स व पेवरफिनिशिंग कामे मिळवण्यासाठी गुहागर तालुक्यातील देवघर येथील बंद असलेल्या हॉटमिक्स प्लांट दाखवला जात असून त्या बोगस प्लांटवर कामे मिळवणाऱ्या ठेकेदारांच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनाप्रमुख निलेश मोरे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या वतीने कामे दर्जेदार व्हावी यासाठी डांबरीकरणाच्याकामासाठी हॉटमिक्स व पेवरफिनिशिंगने करावीत, अशी अट टाकली जात आहे.मात्र त्याप्रमाणे असलेल्या अटींचे आपल्या प्रशासनाकडून पालन केले जात नसल्याने निलेश मोरे यांनी गुहागर नगरपंचायतीला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे आतापर्यंत डांबरीकरणाच्या कामांमध्ये देवघर येथील हॉटमिक्स प्लांट दाखवला जात आहे. मात्र या मशनरीने गुहागर शहरांमध्ये या आधी कोठेही काम केलेले आढळून आले नाही. यामुळे कागदपत्रे टाकून काही मोजकेच ठेकेदारांना अशी कामे मिळवण्यासाठी नगरपंचायतीकडून सेटिंग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.नुकतीच गुहागर नगरपंचायतीने दुर्गा देवी मंदिराजवळी रस्ता तयार करणे, खालचापाट जांगळवाडी येथील रस्ता तयार करणे , गुहागर बाग मधील रस्ता तयार करणे अशा तब्बल 33 लाख रुपये कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.या तीन कामाकरीता हॉटमिक्स पवारफिनिशिंगचे कामे करावयाची अट टाकण्यात आली. सदर कामांची निविदा ज्या ठेकेदारांनी भरली आहे त्यांनी कागदोपत्री वरील अटी पूर्ण केले आहेत. जवळच्या गुहागर तालुक्यातील गुहागर – चिपळूण मार्गावरील देवघर येथील हॉटमिक्स प्लांट दाखविता ज्या प्लांटमध्ये यापूर्वी कोणतेच काम केले गेले नाही. अशा बंद पडलेल्या व केवळ या ठिकाणी प्लांट आहे हे दाखवून कामाची निविदा भरली आहे यामुळे आताच्या ठेकेदाराने सदर प्लान दाखवला आहे. त्याच प्लांट वरील मशिनरीने काम करावेत अशी आमची मागणी आहे. अन्यथा सदरचे काम आम्हाला थांबवावे लागतील. प्रशासनालाही हे माहीत असून हा बंद पडलेला प्लांट गृहीत धरून संबंधित ठराविक ठेकेदारांना कामे दिली जात आहेत.दरम्यान गुहागर नगरपंचायतीमध्ये सुरू असलेल्या या अजब प्रकाराबाबत मुख्याधिकारी यांनी वेळेत दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागेल असेही या तक्रारीत म्हटले आहे ज्या ठेकेदाराला नगरपंचायत सदर कामे देत आहे त्या ठेकेदाराने लिहून दिलेल्या करारनामेप्रमाणेच काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे व तशी त्यांच्याकडून खातरजमा करूनच त्यांना कार्यारंभ आदेश द्यावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे.