चिपळूण नगरपालिकेच्या हनुमान व्यायाम शाळेची दुरावस्था अधिकारी वर्ग लक्ष देणार का..?

0
75
बातम्या शेअर करा

चिपळूण – सर्वात जुनी ओळख असलेल्या चिपळूण नगरपालिका मालकीच्या हनुमान व्यायाम शाळेची पूर्ती दुर्दशा झालेली आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू ठेवलेल्या व्यायाम शाळेतील व्यायाम साहित्याचे अवस्था धोकादायक झाली आहे.

अनेक व्यायाम प्रकाराचे साहित्य कमकुवत व मोडकळीस आले असून या साहित्याच्या आधारे तरुणांना कसरत करावी लागत आहे.पंधरा वर्षांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक संतोष टाकळे यांच्या प्रयत्नाने हनुमान व्यायाम शाळेला नव्याने ताकद देण्यात आली. लाखो रुपये किमतीचे साधने व साहित्य टाकळे यांनी स्वतः लक्षपूर्वक व माहिती घेऊन साहित्याची उपलब्धता करत व्यायाम शाळेला अत्याधुनिक साज दिला. सुरुवातीच्या काळात उत्तम दर्जाचे साहित्य व साधने उपलब्ध असल्यामुळे शहर परिसरातील अनेक तरुण हनुमान व्यायामशाळेकडे वळले. काही वर्ष सुस्थितीत व्यायाम शाळा सुरू होती चांगल्या दर्जाचे साधने असल्याने सुरुवातीला नगरपरिषद प्रशासनाकडून देखभाल दुरुस्ती कडे फारसे लक्ष दिले गेले नाही कालांतराने व्यायाम शाळेतील साधने व साहित्याची हळूहळू दुरावस्था होऊ लागली त्यातच गतवर्षीच्या महापुरात संपूर्ण व्यायाम शाळेची दयनीय अवस्था झाली व्यायाम शाळेचा रंग उडाला भिंतीच्या लोखंडी साधनांना गंज चढला काही साहित्य मोडकळीस आले. साहित्य साधनांवरील गाड्या पाण्यामुळे बाद झाल्या याबाबत अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत दिवसभरात दोन सत्रांमध्ये शंभरहून अधिक तरुण हनुमान व्यायाम शाळेत व्यायामासाठी येत असतात त्यांच्यासह व्यायाम शाळेची देखभाल करणाऱ्या न. प. कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला अनेकवेळा दुरवस्थेची कल्पना देऊनही अद्यापपर्यंत दुरावस्था रोखण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत पुराच्या वेळी व्यायामशाळा मातीने बरबटली होती. ती माती देखी साफ करण्यात आली नाही.लोखंडी साहित्यासह खिडक्यांच्या जाळ्या, पंखे, भिंती व्यायाम साहित्यावरील गाद्या यांच्यावरील राहिलेल्या मातीचा धुरळा व्यायाम शाळेत पसरू लागला आहे. अनेक साधने मोडकळीस आली असून काही धोकादायक झाले आहेत. या अशा साहित्यावरच सध्या तरुण व्यायामाची कसरत करत आहेत.शहरात इतर प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करणारी नगरपालिका या व्यायाम शाळेला पुन्हा एकदा नवीन साज देईल का याची चर्चा सध्या सर्वत्र चिपळूण शहरात सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here