संगमेश्वर – संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचा बारावीच्या उज्वल निकालाची परंपरा मुलांनी यावर्षीही कायम राखली आहे . प्रशालेचा विज्ञान शाखेचा निकाल ९८:६८ , वाणिज्य शाखेचा ९७:११ तर कला शाखेचा निकाल ६८:७५ टक्के लागला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष सुधाकर नारकर , उपाध्यक्ष अभय गद्रे , सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर , पर्यवेक्षक सचिनदेव खामकर यांनी अभिनंदन केले आहे .
विज्ञान शाखेत ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते , त्यातील ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रथम क्रमांक संपदा मोहन गुंड ७१ : ८४ , द्वितीय रंजन अनंत फटकरे ६८ : ९२ , तृतीय अर्मता विश्वास शिगवण ६८ : ४६ टक्के
वाणिज्य शाखेतून १०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले , त्यातील १०१ उत्तीर्ण झाले . प्रथम क्रमांक युक्ता नंदकुमार गुरव ७८ : १५ , द्वितीय तेजस प्रकाश फटकरे ७५ : ०० , तृतीय स्नेहल वसंत शिंदे ७२ : ३० टक्के
कला शाखेतून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील ११ उत्तीर्ण झाले . प्रथम क्रमांक अंकुर भीमराव मोहिते ५६ : ०० , द्वितीय सानिध्य शांताराम बांबाडे ५१ : ३८ , तृतीय पवार अंकिता अशोक , शिंदे दिक्षा उमेश ५० : ९२ टक्के