रत्नागिरी – कोकणातील गणेशोत्सव हा प्रमुख सण आहे. कोकणातील अनेकजण कामनिमित्त मुंबई, पुणे ,ठाणे येथे असल्याने गणपती उत्सवासाठी त्यांना कोकणात आणताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता स्थानिक प्रशासन घेईल, तर सर्वांना मुंबईतूनच पास देण्याचा प्रयत्न केला जाणार असून टोल माफ केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
त्यामुळे आता कोकणातील गणपती उत्सवासाठी चाकरमानी येण्याचा प्रश्न मोकळा होणार आहे.