मुंबई – बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के
सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के
कोकण – 95.89 टक्के
पुणे – 92.50 टक्के
कोल्हापूर – 92.42 टक्के
अमरावती – 92.09 टक्के
नागपूर – 91.65 टक्के
लातूर – 89.79 टक्के
मुंबई –89.35 टक्के
नाशिक – 88.87 टक्के
औरंगाबाद – 88.18 टक्के