बातम्या शेअर करा

मुंबई- ज्यावेळेला आपल्या शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला.

उद्धव ठाकरे आजच्या दसरा मेळाव्यात प्रचंड भावनिक झालेले बघायला मिळाले.जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बघिनी आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झालेला आहे. अभूतपूर्व! मनापासून सांगतो, मी भारावून गेलो आहे. भाषणासाठी खूप मुद्दे आहेत. पण मी खरंच किती बोलू शकेन. कारण तुमचं हे प्रेम पाहिल्यानंतर मुद्दे असले तरी शब्द सूचत नाही. हे विकत मिळत नाही. ओरबाडून घेता येत नाही. माझ्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच शिवतीर्थावर मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तुमच्यासमोर नतमस्तक झालो होतो. आजसुद्धा डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कारण हेच आशीर्वाद आहेत. आई जगदंबेचे जीवंत कवच आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यांनी गद्दारी केली त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडला होता की, अरे बापरे आता पुढे काय? पण माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. आज शिवतीर्थ बघून पुन्हा त्यांना प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाडे देऊन आलेला नाही. वृद्ध, दिव्यांग लोकं आले आहेत. गावावरुन पायी चालत लोकं आहेत. तिथे एक आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता कितीचा झाला? आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे. वाईट एका गोष्टीचा वाटते आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो, मी बोललो नाही तुमच्याशी, माझे बोटंही हलत नव्हते, शरीर पूर्ण पडलं होतं. ते कटप्पा, हो कटप्पा म्हणजे कट करणारे अपत्य म्हणजे कटप्पा हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही, आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कुणाला कल्पना नाही की हा फक्त उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ही शक्ती माझ्या आई जगदंबेने दिली आहे. त्या शक्तीशी तुम्ही पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. पण तेजाचा एक शाप असतो तो तेजाचा शाप आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here