मुंबई – मी अनेक शिवाजी पार्कच्या सभा पाहिल्या पण आजची सभा वेगळी आहे. आजच्या गर्दीतून तुम्ही दाखवून दिले की हीच खरी शिवसेना आहे.
बिंदुमाधव यांचे चिरंजीव एकनाथ शिंदेंसाठी न्यायालयाची लढई लढत आहेत. स्मिता ठाकरे आज एकनाथ शिंदेंसोबत आहेत. जयदेव ठाकरे व्यासपीठावर येऊन गेले, त्यांनी एकनाथ शिंदेंना आर्शिवाद दिले. राज ठाकरे तुमच्यासोबत नाहीत. उद्धवसाहेब तुम्ही कुटुंब सांभाळू शकले नाहीत महाराष्ट्र काय सांभाळणार ? असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला.