आबलोली ; ड्रोनद्वारे फवारणी प्रशिक्षण संपन्न

0
57
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुका कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व माउली ग्रीन आर्मी गरुडा एरोसस्प्रेस प्रा. लिमिटेड यांच्यातर्फे एका प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आबलोली येथील शेतकरी (बागायतदार) सचिन बाईत यांच्या बागेमध्ये ड्रोनद्वारे झाडावर फवारणी प्रशिक्षण व यंत्राची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.यावेळी गरुडा एरोस्प्रेस प्रा. लि. कंपनीचे अधिकारी एस. सानप व त्यांचे सहकारी उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली. त्यावेळी विलास गुरव, सडे जांभारीचे सरपंच अंकुश माटल, अप्पा कदम, महेंद्र कदम, स्वप्निल सुर्वे, सचिन सावंत, शाम गडदे, रवींद्र गडदे, शरद सुर्वे, स्नेहल बाईत, शैलेश नार्वेकर, संदीप ठोंबरे, आशीर्वाद बारस्कर, हेमंत गुरव, रजत बाईत, संतोष माटल, स्वप्निल सावंत, संतोष गुरव, अमोल पवार, राजेंद्र पवार, संदेश सुर्वे, सिद्धेश रहाटे, संदेश पवार, पिंटू निमुणकर तसेच कृषी अधिकारी बी. पी. यादव, यू. सी. स्वामी, के. डी. देमुंडे, कृषी सहायक बाजकर उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here