मोडक समितीच्या अहवालाची होळी करणार – चिपळूण बाचव समिती

0
90
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण मधील महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने स्थापन केलेल्या मोडक समितीने अनेक बाबी लपवल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी गंभीर गोष्टींना बगल दिली आहे.

समितीच्या सूचना स्वागतार्ह आहेत.मात्र कोळकेवाडी धरण महापुराला जबाबदार नाही, हा त्यांचा दावा चुकीचा आहे या अहवालातील त्रुटी मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येणार आहेत चिपळूणकरांना बुडवणाऱ्या या अहवालाची चिंचनाक्यात होळी करणार असल्याचा इशारा चिपळूण बचाव समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. काही दिवसांपूर्वी मोडक समितीने महापुराबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे या अहवालात अतिवृष्टीमुळे २०२१ चा महापूर आल्याचा स्पष्ट उल्लेख आहे यावर चिपळूण बचाव समितीने समितीचे सदस्य म्हणाले की वाशिष्ठी वळण, वैतरणा नदी, चौथा टप्पा व पावसाचे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते हे धरण १.३५ टीएमसी क्षमतेचे आहे वीज निर्मितीनंतर ६ तासात धरणाची पाणी पातळी १.२७ टीएमसी इतकी होते. पावसाळ्यात जलसंपदा अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे पाणी सोडण्याचे नियोजन नव्हते.पाणी साठवणुकीला आमचा आक्षेप होता चिपळूणकरांच्या हिताचा त्यांनी विचार केलेला नाही त्यांनी अहवालात अनेक बाबी लपवल्या आहेत असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला २१ जुलै २०२१ रोजी कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती न करता थेट पाणी सोडले होते त्याबाबत या अहवालात अनेक त्रुटी राहिल्या आहेत समितीमधील मोडक वगळता महापुरास सर्व अधिकारी यामध्ये दोषी आहेत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चिपळूनात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी भरले.२१ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जलसंपदा अधिकाऱ्यांनी मान्य केल्या नव्हत्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी थेट फोन केल्यानंतर धरणातून पाणी सोडणे बंद झाले. अनेक त्रुटी असलेल्या हा अहवाल शासनाने फेटाळला अशी आमची मागणी असल्याचे यावेळी ठामपणे सांगण्यात आले कोकणातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री जिथे भेट घेऊन महापुराबाबतचे पुरावे सादर करणार आहोत शासनाने हा अहवाल मान्य केल्यास चिपळूण शहरात मारण्यात आलेल्या लाल व निळ्या पूररेषेचे भूत चिपळूणकरांच्या मानगुटीवर बसणार आहे त्यासाठी आम्ही यापुढील कालावधीतही लढा देणार आहोत लवकरच मोडक समितीचा अहवाल शहरातील मुख्य असलेल्या चिंच नाक्यात जाणार असून अभ्यास गट समिती निषेध करणार असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले यावेळी समितीचे बापू काणे, अरुण भोजने, शिरीष काटकर, राजेश वाजे, महेंद्र कासेकर, किशोर रेडीज, उदय ओतारी आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here