चिपळूण – चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे पेशाने मूळचे ठेकेदारच, पण जे आज कॉन्ट्रक्ट, ठेकेदारीवर बोलतायत ते शिवसेनेच्या जीवावर हायमारी करून पैसे मिळवलेले ठेकेदार. त्यांचे बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सदानंद चव्हाण यांना ठेकेदार संबोधुन टिका करणाऱ्या पैसा , व ठेकेदार, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची व संघटनेची वाट लावली. वरिष्ठ लोकप्रतिनिधीची हूजरेगिरी करूनच वेगवेगळ्या ठिकाणची कंत्राटे मिळवली असा आरोप शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे यांनी केलाय त्यांनी एका परिपत्रकाद्वारे केला आहे.
सामान्य जनतेला अन शिवसैनिकांनाही खरं काय आणि खोटं काय हे माहित आहे. त्यामुळेच असे बोलून आपली पदे राखण्यास हा आटापिटा सुरु आहे. लोटे एम आय डिसी भंगाराची कंत्राट कुणाकडे? महामार्ग क्र ६६ चौपदरीकरणातील रखडलेल्या परशुरामघाट ते सावर्डे कोंडमळा येथील कंत्राटे तसेच परशुराम घाटातील चुकीच्या पद्धतीने झालेले खोदकाम, आणि तेथे झालेल्या दूर्घटनेत मातीच्या ढिगार्याखाली गाडले जाऊन गेलेले बळी, झालेली जिवीतहानी ही कुठल्या कंत्राटदारामूळे झाली? आरजिपिपि एल. गुहागर येथील कंत्राट कस कुणी मिळवल? पोफळी जलविद्यूत प्रकल्पातील कंत्राट कशी मिळाली ? या सार्या गोष्टीची खडणखडा माहिती लोकांना, शिवसैनिकांना आहे. अशा गोष्टीनी पक्षाची पडझड होऊन वाट लागलेय हे न समजण्या इतपत जनता दूध खूळी नाही. म्हणूनच ही ठेकेदारी शाबूत ठेवण्यासाठी जी धडपड सुरू आहे, ती फार केवीलवाणी आहे. मूळात आम्ही जर या विषयात सखोल बोललो तर बरच काही बाहेर येऊन अडचण निर्माण होइल. त्यामूळे, पक्ष संघटना कशी वाढेल आणि आपले टेबल, ठेका, कंत्राट कशी चालु रहातील यांचा विचार करा.
त्यामुळे आमचे काम आम्हाला करू द्या, आपली पोपटपंची बंद करा हा इशारा अभय सहस्त्रबुद्धे
यांनी दिला आहे. आम्ही सुद्धा शिवसैनिकच आहोत तेव्हा आपल्या बोलण्याला लगाम लावा असा इशाराही त्यांनी दिलाय. मात्र असं असलं तरी या निवेदनात कुणाचं नाव नाही… किंवा कुणाच्या नावाने हे आरोप केलेले नाहीत. त्यामुळे हे आरोप नक्की कोणावर केलेत असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात चिपळूणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असे युद्ध रंगणार हे मात्र तेवढेच खरं…