गुहागर पोलिसांची दमदार कामगिरी ; सायबर गुन्ह्यातील आरोपीला परराज्यातून केली अटक

0
554
बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यातील पहिला आरोपी गुहागर पोलिसांनी दिल्ली येथून अटक करण्यात गुहागर पोलिसांना यश आले असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गुहागर तालुक्यातील जानवळे येथील एका महिलेचे 14 फेब्रुवारी 2022 रोजी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड मधील लावण्यात येणारे एक्स्ट्रा चार्जेस रद्द करून देतो असे फोन द्वारे संपर्क साधून आरोपीने आयसीआयसी क्रेडिट कार्ड मधील सोळा अंकी क्रमांक आणि ओटीपी क्रमांक जाणून घेत जवळपास 80 हजार एवढी रक्कम फिर्यादीच्या खात्यातून परस्पर काढली होती.याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या देखरेख खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते पोलीस हवालदार हनुमंत नलावडे पोलीस नाईक राजेश धनवडे पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओव्हाळ तसेच त्या पथकाचे पोलीस हवालदार रमिझ शेख यांच्या टीमने या गुन्ह्यात आरोपीचा मार्ग काढत दिल्ली नंतर जयपूर गाठले या ठिकाणी आरोपी विशाल सिंग शेखावत याने हाउसिंग डॉट कॉम या बनावट लिंक द्वारे हे पैसे ट्रान्सफर केल्याचे उघड झाले. त्यानंतर नुकतेच या पथकाने दिल्ली येथे जाऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले गुहागर पोलिसांनी सायबर क्राईम बाबत केलेला हा तपास असुन जिल्ह्यात सायबर क्राइमचा हा परराज्यातून आणलेला पहिला आरोपी असल्याने गुहागर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here