गुहागर ; अकाउंट मधून परस्पर काढले 76 हजार 734 रुपये..

0
451
बातम्या शेअर करा

गुहागर- गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील एका तरुणाच्या अकाउंटवरुन परस्पर 76 हजार 734 रुपयांची रक्कम काढल्याची घटना घडली आहे.

याबाबतची फिर्याद दिलीपकुमार रामजन्म सिंह याने पोलीस स्थानकात दिली. ही घटना 15 ते 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास घडली.गुहागर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार सिंह यांना कोणताही अनोळखी कॉल आलेला नाही तसेच त्यांनी कोणालाही बँकेची डिटेल्स दिलेली नाहीत किंवा त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आलेला नाही असे असतानाही त्यांच्या अॅक्सिस बँकेतून अकाउंटवरुन अज्ञाताने 76 हजार 734 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. सिंह यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादवि कलम 420, 419 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (क) (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here