गुहागर; दोन एसटीची जोरदार धडक

0
162
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील धोपावे चिपळूण अशी जाणारी एसटी आणि गुहागर श्रृंगारतळी मार्गे अंजनवेल कडे जाणारी एसटी या दोघांमध्ये जोरदार धडक झाली.

यामध्ये शाळेतील मुलांसह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रानवी पवार साखरी मार्गावरील नागदेवाडी फाट्या नजीक घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यात मदत केली.घटनास्थळी गुहागर पोलीस आणि एसटी प्रशासन तातडीने रवाना झाले असून, अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी दाखल केले आहे. यातील दोघांना गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये तर, दोघांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित अपघातग्रस्तांना आर. जी. पी. पी. एल च्या दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here