सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे विविध कार्यक्रम

0
122
बातम्या शेअर करा

चिपळूण -चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता साजरा केला जाणार आहे.

या निमित्ताने चिपळूण नागरी परिवाराचा स्नेहमेळावा व सहकार सभागृहाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिली.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण तब्बल ५१ वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटकांना सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा, तसेच शेतीपूरक व्यवसाय करता, कर्जपुरवठा करून संस्था या सर्वांसाठी आधारवड बनली आहे. यामुळे सुभाषराव चव्हाण यांच्याविषयी सर्वांच्या मनात आधाराची भावना आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. या निमित्ताने आगळे वेगळे संकल्प केले जातात.या सोहळ्यानिमित्त चिपळूण नागरीच्या परिवाराचा स्नेहमेळावा व सहकार सभागृहाचे उद्घाटन नियोजित करण्यात आले आहे. संस्थेचे सहकार सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांची उणीव भरून काढणार आहे. या सहकार सभागृहात रात्री ८ वाजता रंग यात्री प्रस्तुत भावभक्ती आणि चित्रगीतांची मैफल, ‘शब्दांच्या पलीकडले’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गायक श्रीरंग कुलकर्णी, चित्रा कुलकर्णी सहभागी होत असून, वैभव फणसाळकर, अक्षय कुलकर्णी, मयूर जोशी, प्रथमेश लाड त्यांना संगीतसाथ करणार आहेत. निवेदकाची भूमिका अभिजीत कुलकर्णी बजावणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here