गुहागर – प्रेमासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले आजचे तरुण काही करू शकतात याचाच प्रत्यय आज गुहागर तालुक्यातील नागरिकांना आला. एका महिलेला भेटण्यासाठी बुरखाधारी वेशात आलेल्या एका तरुणाचा काही जागृत नागरिकांनी चांगलाच बुरखा फाडला हा घातलेला बुरखा विशिष्ट समाजाचा वेशधारी असल्याने जातीय तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हा तरुण चिपळूण शहराजवळचा असून तो बुरखा वेशात का आला याची चौकशी गुहागर पोलिसांनी शृंगारतळी येथे केली असता प्रथमदर्शी एकतर्फी प्रेमातून एका महिलेला भेटण्यासाठी आल्याचे त्याने कबूल केले.
शृंगारतळीत बाजारपेठेत नेहमीच वर्दळ असते त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे कोणाचेच लक्ष नसते त्यामुळे आपला डाव यशस्वी होईल या आशेने चिपळूण तालुक्यातील एक तरुण एकतर्फी प्रेमातून एका महिलेला भेटण्यासाठी शृंगारतळीत आला होता.त्याने चक्क मुस्लिम समाजाच्या बुरखा घातला होता बाजारपेठेतून फिरत असताना एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने त्याला बरोबर घेरले त्याच्या भीतीने या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र येथील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले हा तरुण बुरखा घालून का आला, त्याचा हेतू काय? अशी चर्चा सुरू होती तसेच बुरखा घातल्याने जातीय तेढ निर्माण होऊ शकते हे लक्षात येताच त्याला गुहागर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने एकतर्फी प्रेमातून भेटण्यासाठी आल्याचे कबूल केले. गुहागरच्या पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.