भास्कर जाधव यांना शह देण्यासाठी..लवकरच गुहागर तालुक्यात होणार शिंदे गट सक्रिय ?

0

गुहागर – लक्ष्मीकांत घोणसेपाटील

राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेत मोठी राजकीय फूट पडली. आता या फुटीचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात दिसणार असून लवकरच गुहागर तालुक्यात शिंदे गट अधिकृतरित्या सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेत प्रवेश करून तालुक्यातील चार जिल्हा परिषद ,आठ पंचायत समिती यावर शिवसेनेचे वर्चस्व ठेवले आणि 2019 च्या विधानसभा ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला तब्बल 35000 पेक्षा जास्त मताधिक्य घेत शिवसेना या ठिकाणी कायम असल्याचा विरोधकांना दाखवून दिले.
नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील दोन शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे गटात जाहीर रित्या प्रवेश केलाय त्यावेळेला जिल्ह्यात शिवसेना फुटून शिंदे गट कोणकोणत्या ठिकाणी सक्रिय होणार याची चर्चा होती. मात्र गेली अनेक दिवस गुहागर तालुक्यात शिंदे गट सक्रिय नव्हता मात्र रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच गुहागर तालुक्यात शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या. आणि शिंदे गट सक्रिय होऊ लागला या शिंदे गटात जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य आणि 25 सरपंच जाणार असल्याची चर्चा सध्या गुहागर तालुक्यात सुरू आहे. तसेच गुहागर तालुका शिवसेनेची जी नवीन कार्यकारणी आमदार भास्कर जाधव यांनी तयार केली आहे. या कार्यकारणी जे जुने शिवसैनिक होते त्यांना डावले असल्याचा रागही अनेक शिवसैनिकांच्या मनात आहे. आणि ते नाराज शिवसैनिकही शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेक शिवसैनिकांशी प्रगती टाइम्सने चर्चा केली असता लवकरच तुम्हाला शिंदे गट मध्ये कोण शिवसैनिक असणार आहेत. शिंदे गटाचा प्रमुख कोण असणार आहे. याबाबत आम्ही सविस्तर सांगू असं त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

एकीकडे राज्यभरात आमदार भास्कर जाधव शिवसेना एकजूट ठेवण्याचे काम मोठ्या जिद्दीन करत आहेत. आणि राज्यभरातील शिवसैनिक त्यांना पाठिंबाही देतायत त्याचं शिंदे गटाला हे सहन होत नसल्याने त्यांनी भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील गुहागर मध्येच शिंदे गट सक्रिय करून त्यांना राजकीय शह देण्याचा प्रयत्न सुरू केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट सक्रिय होणार असून तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या शृंगारतळी येते यांचे मध्यवर्ती कार्यालय होणार असल्याचे सूत्रांकडून कळते त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवात गुहागर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का याकडे सर्वच तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here