गुहागर – सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या वैद्यकिय टीमने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने एका गरीब महिलेला मोठा दिलासा दिला आहे.
तब्बल ११ लाख ४४ हजार इतके बील माफ करत पुन्हा एकदा ही टीम गरिबांची कैवारी असल्याचे दाखवून दिले आहे. सुनीता साखरे ही महिला दीड महिन्यापासून नवी मुंबई हॉस्पिटलला निमोनिया झाला म्हणून ऍडमिट होती. घरची परिस्थिती गरीब मात्र हॉस्पिटलचे बिल झालं. १७ लाख ४४ हजार खरंतर एका गरीब कुटुंबाला हे बील आवाक्याबाहेर होते. तरीही कुटुंबाने ६ लाख कसे तरी जमा करून हॉस्पिटलला अदा केले. मात्र शिल्लक रक्कम भरण्यासाठी हॉस्पिटल दबाव टाकत होते आणि पूर्ण रक्कम अदा केल्याशिवाय रुग्णाला डीचार्ज देत नव्हते. हतबल झालेल्या नातेवाईकांनी अखेर गुहागर तालुक्यातील वाडदई गावामधील संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीममधे काम करणारे युवक अजित भेकरे यांना संपर्क केला अजित यांनी जैतापकर यांच्या वैद्यकीय टीममध्ये लगेच हा संदेश पाठवला यानंतर काशीराम पास्टे आणि मनोज डाफळे यांनी सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेऊन रुग्णाच्या नातेवाईकाना धीर देत सूत्र हलवली. यानंतर मुख्यमंत्री कार्यालय आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना संपर्क करून सर्व माहिती दिली. वैद्यकीय टीम स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटला डीचार्ज करून घेतला आणि उर्वरित बिल माफ करून घेतले. यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि त्यांच्या वैद्यकीय विभागातर्फे चांगले सहकार्य मिळाले. यासाठी मंगेश चिवटे, राम राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमचे शिलेदार काशीराम पास्टे, मनोज डाफळे, अजित भेकरे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी या वैद्यकीय टीमचे आभार मानले.