चिपळूण ; परशुराम घाट आजपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी २४ तास खुला – जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

0
456
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे परशुराम घाटामध्ये वाहनांची वाहतुक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यकती उपाययोजना करुन त्यांचे निरीक्षणाखाली आज दि. २४ ऑगस्टपासून परशुराम घाटातील सर्व प्रकारची वाहतुक २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.

वाहतुकीला परवानगी देत असताना प्रशासनाने काही अटी शर्थी लागू केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने-1. परशुराम घाटात दरड प्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळेत पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी.2. परशुराम घाटात ठेकेदार कंपनीकडून नियमित पेट्रोलिंग ठेवण्यात यावे. तसेच पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांचा वाहन क्रमांक तसेच पेट्रोलिंग करणारे अधिकारी / कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक बाबतचा तपशील घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा.3. दरडप्रवण क्षेत्रात जेसीबी , क्रेन, पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध ठेवाव्यात. तसेच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक बाबतचा तपशील घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा.4. नेमण्यात येणारे बंदोबस्ताचे पॉईटवर ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपलब्ध ठेवावेत व त्यांचे संपर्क क्रमांक बाबतचा तपशील घाटातील मेन कंट्रोल रूम सह घाटातील दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा.5. दरडप्रवण क्षेत्राचे ठिकाणी धोक्याचे फलक लावण्यात यावेत.6. दरडप्रवण क्षेत्रात मुंबई , पुणे महामार्गावर असलेल्या फेन्सींग प्रमाणे फेन्सींग करणे आवश्यक आहे. 7. घाटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संरक्षक भिंती बांधणे आवश्यक. 8. बंदोबस्ताचे ठिकाणी पेंडॉल , पाणी, लाईट, व जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. 9. रेड अलर्ट, अतिवृष्टीचेवेळी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा व वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचा निर्णय संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांनी संयुक्तपणे घ्यावा.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here