अवैध उत्खनन ; तिघांना ४० लाख दंड

0
379
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे तिघा व्यावसायिकांनी अवैध्य गौण खनिज उत्खनन केले असल्याचे आढळले आहे.

त्यानुसार तहसीलदारांनी या तीन व्यवसायिकांना 40 लाख 26 हजार 135 रुपये दंड सोनावला आहे. महिनाभरात दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोरगाव येथील संजय बाबू घुमने यांना 68.9 ब्रास प्रकरणी 6 लाख 30 हजार 435 रुपये, सिताराम बाजी साळुंखे यांना 267.76 ब्रास प्रकरणी 24 लाख 9 हजार 840 रुपये, विक्रम विश्वनाथ साळुंखे यांना 109.54 ब्रास प्रकरणी 9 लाख 85 हजार 860 रुपये असे एकूण 40l लाख 26 हजार 135 रुपयांना दंड सूनवला आहे. चिपळूण तालुक्यातील बोरगाव, चीवेली, कौढर येथील अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसील कार्यालयाकडून कारवाई प्रश्न केवळ नोटीसंचा सिलसिला सुरूच आहे. गतवर्षी याच परिसरातील 27 खान चालकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही येथील संबंधित व्यवसायिकांना तीन ते चार वेळा दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या; परंतु अद्याप याबाबतची कारवाई पूर्णत्वास गेलेली नाही. अशातच आता तिघांना अवैध्य गौण खनिज उत्खनन केल्याने लाखो रुपये दंडाच्या नोटेसा दिल्या आहे. बोरगाव परिसरात विनापरवाना व बेकायदेशीर जांभा खाणव्यवसाय नियमित केला जातो. याप्रकरणी बोरगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. या पाठपुराव्यानंतर येथील तहसील कार्यालयानेगत वर्ष 27 चिरेखाण मालकांना नोटीस बजावत कागदपत्रांची मागणी केली होती. या 27 जणांना दोनदा नोटीसा बजावल्या आहेत; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. बोरगाव परिसरातील अनधिकृत चिरेखणीला प्रशासन पाठीशी घालत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते साळुंखे यांनी गेल्या चार वर्षांपासून याबाबतचा लढा सुरू ठेवला आहे. तिला महसूल यंत्रणेने ही दाद दिली नाही. मात्र माहिती अधिकारात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महसूल यंत्रणा खाणमालकांना कशी पाठीशी घालते. हे शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here