गुहागर तालुक्यातील मराठा समाज संपर्क अभियान आणि युवा मेळावा मुंबई संपन्न

0
543
बातम्या शेअर करा

मुंबई – क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर (रजि) संलग्न, “क्षत्रिय मराठा युवा संघटना, गुहागर ” (मुंबई) यांचा मराठा युवा मेळावा व संपर्क अभियान आज मुंबई येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परेल (भोईवाडा) येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सिद्देश खानविलकर अमेय जाधव
प्रताप चव्हाण गणेश चव्हाण.यांनी केले होते.

क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी भालचंद्र चव्हाण व सुभाष जाधव व सदस्य ,सुनिल नलावडे, रवीद्र चव्हाण ,अरविंद चव्हाण,नामदेव खेतले,अभय घाग.अशोक चव्हाण. सुरेश चव्हाण, दीपक चव्हाण, शशिकांत पवार.असे अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते तसेच क्षत्रिय मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी अँड संकेत साळवी ,अमिश कदम व सदस्य अजय खाडे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले तर यावेळी युवा संघटनेची प्रमुख उद्दिष्टे सुद्धा जाहीर करण्यात आली ती खालीलप्रमाणे

मुंबई येथील मराठा तरुण-तरुणींची संघटनात्मक बांधणी करणे
गुहागर तालुक्यातील व मुंबई येथील उद्योजक, व्यवसायिक मराठा बांधवांच्या व्यवसायाची ओळख समाजातील इतर बांधवांना करुन देणे
मराठा तरुण-तरुणींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
मराठा तरुण-तरुणींकरिता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे.
गुहागर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार, व्यवसाय व नोकरीची संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
गुहागर तालुक्यातील परंतु कामधंद्या निमित्त बाहेरगावी असलेल्या मराठा नोकरदार, मराठा उद्योजक व मराठा व्यवसायिक यांचा डाटा तयार करून त्यांच्यासोबत समन्वय निर्माण करणे.
अडचणीत सापडलेल्या मराठा बांधवांना मदत करणे तसेच वेळ प्रसंगी मराठा समाजाची एकजूट दाखवून देणे. मराठा भवन उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे व त्यामध्ये सक्रीय सहभाग घेणे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here