गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू रेल्वे

0
114
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.१९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी लावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here