मंडणगड – मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षानुवर्षे दगड, माती व झाडे झुडपात लुप्त झालेला मुख्य प्रवेशद्वार प्रकाशात आणला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या अभ्यास मोहिमेदरम्यान हा दरवाजासमोर आला.
गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी राजमार्गही आहे. साधारण आठ फूट लांब आणि चार फूट उंच हे प्रवेशद्वार असून, त्याचा घेरा देवढ्याचा परिसर २१ बाय २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढा आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून, त्यावर ढासळलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत. सध्या गडावर प्रवेश करतो तो डांबरी रस्ता गडाचा पूर्वीचा मुख्य मार्ग नसून त्याच्या खालच्या बाजूला मुख्य राजमार्ग आहे. या मार्गाने प्रवेश केल्यावर थेट गणेश मंदिराच्या दिशेला बाहेर पडतो. या अभ्यास मोहिमेत गडाचा पूर्ण परिसर अभ्यास करून पुढील संवर्धन कार्याची दिशा ठरवण्यात आली. या मोहिमेत योगेश निवाते, ललितेश लवटे, अमित महाडिक, अमोल भुवड, सोमेश बुरूनकर, सुयोग मयेकर, सिद्धेश जाधव ,सागर पाटील आणि गणेश रघुवीर हे उपस्थित होते.