चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण बाजारपेठ सुरू करण्यात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी परवानगी दिल्यानंतर व्यापारी प्रतिनिधी शरीष काटकर, सुचयअण्णा रेडीज, अरुण भोजने यांनी सोमवारी कुणीही दुकान उघडू नये, त्यादिवशी १०० टक्के दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन केले होते.
या आधी काही दुकानदार सोमवारी दुकाने सुरु ठेवत असत. मात्र, या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आज सोमवारी चिपळूण बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवली आहे. भाजी, मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत. शिरीष काटकर यांनी सर्व व्यापाऱ्यांचे याबद्दल जाहीर आभार मानले आहेत.