गुहागर – गुहागर तालुक्यातील पालशेत येथे आज भुरट्या चोरांनी 8 दुकाने फोडली. यामध्ये फक्त चोरांना हाती काही लागले नसले तरी सर्व दुकानातील वस्तूची नासधूस करून 3000रुपये चोरांनी लंपास केले आहेत.
पालशेत येथील या 8 दुकानापैकी दोन दुकानांची शटर पहारीने फोडले तर हाँटेलमधील सुमारे 1000 रु, मटण दुकानातून व किराणा मालाच्या दुकानातून प्रत्येकी सुमारे ५०० रु. चोरी केली. त्याचबरोबर चोरट्यांनी अपेक्षित ऐवज न मिळाल्याने दुकानदारांच्या मालाची नासधूस केली. अंकुश बोटकेच्या किराणा दुकानातील अंडी फोडून टाकली. मैदा, फरसाण, साखर आदी किराणा जमिनीवर टाकून नासधूस केली आहे. संतोष जोशी यांच्या विमा कार्यालयातील कागदपत्रे इतस्ततः पसरुन टाकली. केसरकरांच्या हाँटेलमधील चहापूड, साखर एकत्र करुन जमिनीवर पसरली. कैलास मांडवकरांच्या इलेक्ट्रिक दुरुस्ती दुकानातून १००० रुपयांची चोरी केली. याच प्रमाणे या अविनाश मोटे, श्रीकांत मांडवकर, आदींची दुकान सुधा या चोरट्यांनी फोडून नासधूस केली आहे. सहा महिन्यांपूर्वी सुधा पालशेत बाजारपेठेत अशीच घटना घडली होती
त्याचा तपास अजून सुरू आहे मात्र त्याचा तपास लागण्याआधीच चोरांनी पुन्हा चोरी करून गुहागर पोलिसांना एक प्रकारे चॅलेंज दिल्याचे बोलले जात आहे.