चिपळूण ; सचिन कदम यांचा सदस्य पदाचा राजीनामा, उबाठा गटात खळबळ

0
393
बातम्या शेअर करा

चिपळूण – गेली ४० वर्षे शिवसेनेत विविध पदावर सक्रीय असणाऱ्या व आता सहसंपर्कप्रमुख म्हणून काम पाहत असलेले सचिन कदम यांनी आपल्या पदाचा व सक्रीय सदस्यत्त्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवविला आहे.

आपल्या राजीनामा मध्ये त्यांनी व्यक्तिगत कारण दिलेले आहे. आपण पक्षाचा कामासाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे पदाचा व सदस्याचा राजीनामा देता येत असल्याचे नमूद केले आहे.गेली ४० वर्ष त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. सचिन कदम यांचा चिपळूण शहरात वर्चस्व होते परंतु त्यांच्या राजीनामामुळे उबाठा गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.सदस्यपदाचा .राजीनामा दिल्यामुळे व पक्षातूनच बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या या निर्णयाने पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.मात्र खरंच व्यक्तिगत कारण आहे की अन्य कारण आहे .याचीही चर्चा राजकीय गोटामध्ये सुरु आहे. भविष्यात सचिन कदम हे वेगळा निर्णय घेतील का याबाबतही चर्चेचा सुर उमटत आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here