पनवेल – पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2022 नुकताच पनवेल येथे संपन्न झाला. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला.
उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया हा राज्यस्तरीय पुरस्कार गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांना रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे आदिती तटकरे – राज्य मंत्री उद्योग आणि खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा व युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड.मनोज सानप जिल्हा माहिती अधिकारी,डॉ. सुहास माने जिल्हा शल्य चिकित्सक, व्ही एस म्हात्रे निवृत्त सचिव महाराष्ट्र राज्य मा. व उ. शिक्षण मंडळ, बाळासाहेब आंबेकर अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद तसेच उत्कर्ष पत्रकार समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे ,गुहागर तालुका उत्कर्ष पत्रकार समिती अध्यक्ष दिनेश साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर पोतनीस व दैनिक प्राऊडचे संपादक उमेश गुजराती यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. पत्रकार क्षेत्रात काम करणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची अनेक पत्रकारांनमधून निवड करण्यात आली. त्यांनी आतापर्यंत केलेली उकृष्ट कामगिरी आणि 2022 साली चिपळूण मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी त्यांनी अनेक अशा घटना समाज्यापुढे आणल्या आणि एक वेगळाच पत्रकारितेत ठसा उमटवला आहे. त्यांनी केलेल्या सहा विशेष स्टोरी ना Tv 9 मराठी कडून विशेष गौरवण्यात आलं होतं. तसेच त्या वेळेला पुरामध्ये अडकलेल्या अनेक कुटुंबाला मदतही केली होती. त्यांच्या या कामाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. या आधी 2021 मध्ये सुद्धा ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आहेत.