भाग -01
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात एखाद्या ठेकेदाराला काम करायचे असेल तर तुमच्यावर येथील अधिकाऱ्यांची मर्जी हवी तरच तो ठेका तुम्हाला मिळेल कारण याच पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याच्या मेहरबानीवर लायसनची मुदत संपलेल्या ठेकेदाराला चक्क करोडो रुपयांचे काम दिल्याचं उघड झाले आहे.त्यामुळे पाणीपुरवठा विभागात जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्याकडे फक्त लायसन्स
हवं त्याची मुदत संपली असली तरी चालेल असेच काहीसे चित्र सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभाग गेली वर्षभर अनेक या न त्या प्रकरणाने नेहमी गाजत असते यात पाणी पुरवठा विभागात सध्या वरदा प्रोजेक्ट्स ला येथील अधिकारी खूपच मेहेरबान असल्याचे दिसत आहे. कारण याच वरदा प्रोजेक्टचे नोंदणी प्रमाणपत्र (लायसन्स ) जे आहे. त्याची मुदत संपलेली असताना सुद्धा कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी त्यांच्या लायसन्स वर कारोडो रुपयाचे काम मंजूर केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत गुहागर येथील चव्हाण कंट्रक्शन यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
जर एखाद्या ठेकेदाराच्या लायसन्सची मुदत संपलेली असेल तर त्या ठेकेदाराला कोणतेही काम किंवा निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही असे असताना मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रत्नागिरी यांनी मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वरदा प्रोजेक्टच्या या ठेकेदाराला मात्र कोणत्या नियमाच्या आधारे मुदत संपलेली असताना ई- निविदा सह काम का देतात असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तरी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन या प्रकरणातील सोक्षमोक्ष करावा अशी मागणी चव्हाण कंट्रक्शन यांनी वरिष्ठांकडे लेखी केली आहे.
वरदा प्रोजेक्ट ठेकेदार यांचे नोंदणी प्रमाणपत्राची ( लायसन्स )
मुदत 25 जुलै 2021 रोजी संपली असताना सुद्धा त्यानंतरच्या अनेक निविदा प्रक्रियेत त्यांना भाग देऊन त्यांना काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आथिर्क गोलमाल करत अधिकारी त्यांना सामील करुन घेत असल्याचा आरोप होत आहे. त्यामूळे येथील अधिकारी , लेखापाल यांच्या कामाच्या चौकशी सह संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.