चिपळूण – मागील वर्षी 22 जुलै रोजी चिपळूण शहरात महापूर आला अनेकांचे संसार उध्वस्त झाले लाखोंची हानी झाली याच वेळेला चिपळूणमध्ये नवीन बांधकाम व नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाची एक विशेष नियम अमलात आला. मात्र असं असलं तरी चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात सध्या मोठेच्या मोठे बंगले बांधले जात आहेत. त्या बंगल्यांच्या बांधकामांना नक्की परवानगी कधीची आहे. याबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
22 जुलै रोजी चिपळूण शहरात महापूर आला त्या आधी शहराचा एक सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये लाल आणि निळा रेषा यामध्ये मार्किंग करण्यात आली होती. त्याच्याच आधारे भविष्यात चिपळूणमध्ये जी काही बांधकाम होतील त्या बांधकामाना कोणत्या प्रकारे परवानगी द्यायची असा नियम ठरवण्यात आला मात्र असं असलं तरी सध्या चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात दोन बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांच्या ठेकेदाराने अथवा मालकांनी परवानगी कधी घेतली ही परवानगी घेतली त्यावेळेला कोणत्या नियमांचे पालन केले गेले. असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.कारण या परिसरात सगळ्यात जास्त पाणी भरते. आणि त्याच ठिकाणी हे मोठे मोठे बंगले बांधले जात आहेत. याबाबत चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता त्या बांधकामाची परवानगी कधीची आहे हे पहावे लागेल असे त्यांनी सांगितले.मात्र असं असलं तरी नवीन बांधकामांना परवानगी देताना त्याच्या नियम आणि अटी पाळल्या जात आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. कारण नियम हे सगळ्यांना एकच असतात.