गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील माळरानावर भव्य अशा जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये गावठी आणि घाटी अशा बैलगाड्यांची स्पर्धा होणार आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धा होणार असल्याची माहिती आयोजक किशोर जाधव यांनी दिली. मंगळवार दिनांक 24 रोजी या स्पर्धा सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहेत या स्पर्धेसाठी विरुद्ध पारदर्शक ठेवण्यात आले आहेत.