गुहागर – गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा पद्माकर आरेकर यांची निवड करण्यात आलेले यावेळी राष्ट्रवादीत आलेली मरगळ झटकून राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेणार का याची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे या रिक्त जागेवर आज गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि संघटनेला अधिक बळकटी मिळावीयासाठी सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जेष्ठ नेते आणि ज्यांना तालुक्याची बारकाईने माहिती आहे असे पद्माकर आरेकर यांना पुनः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली यावेळी जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष हुमणे गुरुजी , नगराध्यक्ष राजेश बेंडल, सेक्रेटरी प्रदीप बेंडल, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, उपाध्यक्ष पांडुरंग पाते, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्नेहा भागडे, ओबीसी सेल अध्यक्ष अजित बेलवलकर , नगरसेविका सुजाता बागकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, दीपक शिरधनकर, पडवे गट अध्यक्ष तुषार सुर्वे, उपाध्यक्ष संतोष मोरे, अनिल शिंदे , राजू भागडे, रोहित मालप, सौरभ भागडे, शुभम शेटे, मानसी शेटे , मयुरेश कचरेकर, शशांक बागकर, तालुका उपाध्यक्ष वैभव आडवडे, जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते आदी उपस्थित होते.