बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण येथे स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत परशुराम घाटातील वाहतूक महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आज दुपारी ११ ते ५ कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक २५ एप्रिल पासून अंदाजे महिन्याभरासाठी परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी काही कामे करायची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परशुराम घाटात पावसाळ्यात प्रवास करत असताना प्रवाशांना अधिक त्रास होत होता. अवजड वाहने जात असताना इतर वाहनांना देखील त्रास व्हायचा त्यामुळे स्थानिक प्रशासनाने रुंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज परशुराम घाटातील वाहतुकीबाबत असे बदल लागू होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता पर्यायी मार्गाने म्हणजे अंबादास – चिरणी – लोटे रस्ता व कळस – आंबड – धामनंद रस्ता मार्ग पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या अवजड वाहने कराड मार्गे जातील अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here