बातम्या शेअर करा

कोल्हापूर – ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या.

‘चित्रकला म्हणजे संवादाचीच एक भाषा होय. चित्रकला म्हणजे मानवी भावना व विचार व्यक्त करण्याचे माणसाला मिळालेले एक अभिजात वरदान होय. या चित्रांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वयाचे विविध टप्पे, राधानगरी धरण, राजर्षी शाहूंच्या शिकारीचा प्रसंग अशा विविधांगी कलाकृतींचा समावेश आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कलाकृतीतून कलाकारांनी जणू राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपटच उलगडला.
‘अवघ्या ६ वर्षे वयाच्या यज्ञेश किरण टाकळकर पासून ८५ वर्षाच्या आर्ट स्कूलच्या पहिल्या पीएचडी प्राप्त करणाऱ्या डॉ. नलिनी भागवत यांनी सहभाग नोंदवला. ही छायाचित्रे आता एक्झिबिशनच्या रूपात सर्वांना  पाहता येणार आहेत. या उपक्रमामध्ये दळवीज ‘आर्ट इन्स्टिट्यूट’, यासह ‘कलानिकेतन कला महाविद्यालय’ सारख्या संस्थानी आपले योगदान दिले.

शब्दांकन :- राजेश कदम


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here