बातम्या शेअर करा

खेड – मुंबई गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे अनेक कारखाने आहेत. मात्र, येथे कामगारांची औद्योगिक सुरक्षा विचारात घेतली जात नसल्याचे विविध घटनांतून दिसून येत आहे.

त्यामुळे नाहक कामगारांचे बळी थांबणार तरी कधी हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे ओद्योगिक विभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियमावलीनुसार जर इथल्या कंपन्या उत्पादन प्रक्रिया राबवत असतील तर अपघात नक्की कमी होतील.मात्र केवळ अधिकाऱ्यांसोबत अभद्र युती करून व दुर्घटना घडल्यावर राजकारणी व संबंधित यंत्रणांशी सेटलमेंट करून विषय मिटवले जातात. परंतु यात बळी मात्र कामगारांचे जातात. ते थांबवणेआवश्यक आहे.लोटे औद्योगिक वसाहतीत सन २०१० मध्ये व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनी सुरू असताना स्फोट झालात्यानंतर लहान-मोठे अपघात होतच होते. . ११ जानेवारी २०२० रोजी व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनीलाआग लागली, त्यामध्ये कंपनीच्या व्यवस्थापकाचा बळी गेला. . ७ मार्च २०२० रोजी नंदादीप केमिकलकंपनीत स्फोट झाला.. २० सप्टेंबर २०२० रोजी एक्सल इंडस्ट्रीजमध्ये स्फोट झाला. जानेवारी २०२१ मध्ये दुर्गा फाईन कंपनीत स्फोट, जानेवारी २०२१ ला लासा सुपरजेनेरिक (जुनी उर्ध्व) केमिकलच्या घनकचऱ्याला आग, सन २०२१ श्रेयस इंटरमिडीएटसच्या (आताची केसर) गोडावूनलाआगलागली. १५मार्च२०२१ रोजी सुप्रिया लाईफसायन्स कंपनीत आग लागून दोन कामगार भाजले.. २० मार्च २०२१ रोजीघरडा केमिकल कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला. . १८एप्रिल २०२१ रोजीसमर्थ इंजिनिअरिंग कंपनीत स्फोट व आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला. याच महिन्यात एमआर फार्मा कंपनीत आग लागली. त्यानंतर बरोबर एक वर्षाने . १८ एप्रिल २०२२ रोजी प्रिव्ही ऑरगॅनिककंपनीत अग्नीतांडव घडले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने असून त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठीआणण्यात आलेले ज्वालाग्राही रसायन हलगर्जीपणे साठा करून ठेवलेले पहायला मिळतात.औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यावरून ये-जा करताना तात्पुरती उभारण्यात आलेली साठा गोदामअनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करताना दिसतआहेत. काही लहान कारखानदार पैसे वाचवण्यासाठी सुरक्षा उपकरण कामगारांना देत नाहीत. अनेककंपन्यांकडे स्वतःचे आपत्कालीन सुरक्षा साहित्य व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. काही कारखान्यातूनअग्निशमन यंत्रणा उभारण्यात आली असली तरी ती कार्यान्वित आहे का नाही? हे तपासण्याची गरज आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here