चिपळूण नागरी पतसंस्था ; मार्च २०२२ अखेर ३० कोटी व्यवसाईक नफा व १६५४ कोटीचा व्यवसाय

0
111
बातम्या शेअर करा


चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ २८ वर्षाच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. मार्च २०२२ अखेर संस्थेला व्यवसायीक नफा ३० कोटी झाला असून संस्थेने १६५४ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.

संस्थेची मार्च २०२२ अखेर सभासद संख्या १ लाख ३१ हजार २५२, भाग भांडवल ६१ कोटी १८ लाख तर एकूण स्वनिधी ११६ कोटी १७ लाख आहे. फक्त २८ वर्षाच्या कालखंडात सभासद संख्या व भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थामध्ये या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या ठेवी ८ ९९ कोटी ५५ लाख एकूण कर्जव्यवहार ७५४ कोटी ३० लाख त्यापैकी सोनेतारण कर्ज २ ९ ४ कोटी २४ लाख तर एकुण प्लेज लोन ३३० कोटी ०६ लाख संस्थेची बँकेतील एकूण गुंतवणूक ३०३ कोटी ४१ लाख आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १६५४ कोटीचा असुन तो २०२५ पर्यंत २५०० कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदिचे वातावरण असुनही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे. कोविडच्या काळात सुध्दा संस्थेने कामकाज अखंडपणे चालु ठेवत ग्राहकांना नियोजनबध्द, नम्र व जलदसेवा दिली आहे. शासनाने ठरवुन दिलेल् प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे, संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम आहे. संस्थेने आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजीक बांधीलकी जपण्यात यशस्वी झाली आहे. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त मोबदला दिला जातो. गेली २३ वर्षे संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलावर १५ टक्के डिव्हींडंट देत आहे. या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.

संस्थेच्या आर्थिक सक्षमते बरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सभासदांच्या मुलांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी सुलभ पद्दतीने अर्थ पुरवठा करण्या बरोबरच त्यांना मार्गदर्शन करणेसाठी सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांची माहितीपर मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येत असतात. या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेती पुरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षात किमान ५००० शेतकऱ्याना शेतीपुरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वीत केला असून त्याला संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फार मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्या शिवाय वेगवेळ्या स्वयंरोजगाराच्या माध्यतातून पुढील ५ वर्षात २५००० बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी काम चालू आहे. त्याचबरोबर नुकत्याच आलेल्याकोरोनाच्या देश व्यापी संकटातही संस्थेने शाखा संलग्न सर्व सभासदांना त्यांच्या आर्थिक संकटात सर्वतोपरी आर्थिक आधार देण्यासंबंधी प्रभावीपणे उपाययोजना कार्यान्वीत केलेली आहे.

चिपळूण तालुक्यात आणि अन्य तालुक्यात दि. २२ व २३ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीत आलेल्या महाप्रलयात असंख्य नागरीकांचे कधिही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. चिपळूण शहरातील काही कुटुंबात वेळेला खायला अन्नसुध्दा उपलब्ध नव्हते अशा सभासदांना संस्थेच्या कर्मचाऱ्यानी धान्य व कडधान्य तात्काळ घरपोच करण्याचे काम अत्यंत तत्परतेने केले अश्या पुरग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठीही संस्थेचे नियोजनबध्द प्रयत्न चालु आहेत. त्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्था, संस्थेचे समन्वयक, स्थानिक कार्यकर्ते यांची मदत घेण्यात येत आहे. समाजातील अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी त्यांची भविष्यातील स्वप्ने साकारता येतील अशा काही ठेव योजना कार्यान्वीत केल्या असून लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी “धनलक्ष्मी ठेव” योजना कार्यान्वीत केली असून आता पर्यंत ४०००० हून अधिक लहान मुलांच्या पालकांनी त्यांची बचतीची खाती सुरू केली असुन ही ठेव योजना लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी ठेव योजना म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय झाली आहे. दरमहा सरासरी २५ लाखाहुन अधिक रक्कम या खात्यांत जमा होत असते. त्याशिवाय अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदाना त्यांच्या भविष्यातील स्वप्ने साकारण्यासाठी १ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या कालावधीच्या एकूण नऊ ( ९ ) आवर्तक ठेव योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असून या योजनेचे ५०००० हून अधिक ठेव खातेदार असून दरमहा साधारण ४ कोटी २५ लाखाहुन अधिक रक्कम त्यांच्या आवर्तक ठेव खात्यात जमा करीत असतात. या ठेव योजनेच्या माध्यमातून संस्थेने सर्व आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम केले आहे. सहकाराच्या मुळ उद्देशा प्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी “सहकार समृध्दी” हा महत्त्वकांक्षी संकल्पपूर्ती आराखडा तयार करण्यात आला असुन तो यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा, सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणाऱ्या असंख्य कार्यकार्त्यांचा मोलाचा सहभाग मिळत असुन आपले यो उद्दिष्ट पूर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिध्द करु. “आपली माणसे आपली संस्था” हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिध्द करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here