गुहागर ; पर्यटकांच्या हुल्लडबाजी विरोधात प्राणीमिंत्रांची नाराजी कासवांचा होतोय छळ

0
289
बातम्या शेअर करा


गुहागर- भारतीय वन्यजीव संस्था आणि वनविभागाच्या माध्यमातून दापोलीतल्या वेळास आणि आंजर्ले या भागातून प्रथमा आणि श्रावणी अश्या दोन मादी कासवांच्या पाठीवर सॅटेलाईट बसवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दापोलीनंतर आता गुहागर मध्येही कासवांच्या पाठीवर सॅटेलाइट टॅगिंग करण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र इथं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.


कासवांसोबत चिलुकले खेळत आहेत. कासवांना स्पर्श करायला सुद्धा चिलुकले पुढे आहेत. एन्जॉय सुरू आहे. याबाबत प्राणी मित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. समुद्र किनारपट्टीवर अंडी घातल्यानंतर मादी कासवांच्या समुद्रातील प्रवासाची माहिती घेण्यासाठी भारतीय वन्य जीव संस्था हा प्रयोग करत आहे. त्यामुळे कोकणातील कासवांच्या सॅटेलाईट कनेक्शनचा प्रयोग यशस्वी झाल्यास मादी कासवांच्या एकूण हालचालीबाबतचा अभ्यास आता भारतीय वन्यजीव संस्थेच्या अभ्यासकांना घेता येणार आहे. यासाठी गुहागर किनाऱ्यावर हा उपक्रम पाहायला मिळाला. मात्र पर्यटक आणि आयोजकच्या कार्यक्रमात मनोरंजन अधिक पाहायला मिळत होते. सकाळी सकाळी कमी गर्दीत असे उपक्रम राबवले जाऊ शकतात मात्र इथं कासवांच्या भावाने पेक्षा इथं सेल्फी कासवासोबत खेळणे चालू आहे हे दृश्या मधून दिसत आहे कासव ही खेळण्याची वस्तू नाही हे वनविभाग कर्मचारी अधिकारी यांना कोण सांगणार त्याच्या समोर हे प्रकार घडत आहेत हे धक्कादायक आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here