लातूर – (विशेष प्रतिनिधी )- लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ लातूर जिल्ह्यातील हडरगुळी मधील दापके कुटंबावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गणेश दापके या तरूणाचा मृतदेह पाझर तलावात सापडला. त्यामुळे गणेशचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील हडरगुळी येथील गणेश याचे 6 फेब्रुवारी रोजी लग्न होते. मागील सोमवारी सकाळी शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. परंतु, तो शेतातून घरी परत आलाच नाही. कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा बराच शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याचा मोबाइल शेताजवळील पाझर तलावाच्या बाजूला आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांना शंका आली. नाईतवाईक तत्काळ वाढवना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी सहकार्य केले नाही. शिवाय पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर सात दिवसांनी त्याचा मृतदेह पाझर तलावात आढळून आला.
गणेश याचा शेताच्या शेजारील व्यक्तीसोबत वाद होता. यातूनच त्याचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. परंतु, पोलीस त्यांना कोणतेही सहकार्य करत नव्हते असा आरोप केला जातोय. यातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी तसेच CBI मार्फत चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आह अशी मागणी केली जात आहे.
31 जानेवारीला आमच्याकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही तपास करत होतो. परंतु, गणेशचा मृतदेह सापडला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती वाढवना पोलीस ठाण्याचे अधिकारी नौशाद पठान यांनी बोलताना दिली.